
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) व अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या असतात. त्या दोघांच्या जोडीला प्रेक्षक भरभरून प्रेम देतात. लोकप्रिय जोड्यांपैकी ही एक लोकप्रिय जोडी आहे. ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा देखील सुरू होत्या.
नवले पुलावरच्या अपघाताचे खरे कारण आले समोर; वाचून तुम्हालाही बसेल धक्का
त्यांच्या रिलेशनशिपबद्दलच्या चर्चा चालू असतानाच सध्या त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा फोटो पाहून चाहत्यांना प्रश्न पडलाय यांनी लग्न केले आहे का? व्हायरल झालेल्या फोटोमध्ये हे दोघे नववधू व वराच्या पोशाखात दिसत आहेत. त्यातचबरोबर गळ्यात हार देखील दिसत आहे. त्यामुळे ते खरंच यांनी लग्न केले आहे का?, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
बिग ब्रेकिंग! नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; दोन दिवसांपासून येत आहेत मेसेज
हा फोटो फॅन पेजवरुन तो शेअर करण्यात आला असून प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र या दोघांनी लग्न केलं नसून व्हायरल होणारा फोटो हा त्यांच्या चाहत्यानेच बनवलेला आहे. या फोटोवर अनेकांनी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मानसी नाईकच्या नवऱ्याबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का? वाचा सविस्तर