
रविवारी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगोला(Sangola) येथील निर्धार मेळाव्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांच्या सरकारची खिल्ली उडवली आहे. यावेळी विनायक राऊत म्हणाले की , एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचं सरकार म्हणजे ‘काळू-बाळूचा तमाशा’ आहे. तर शहाजीबापू पाटील हे त्यातील ‘सोंगाड्या’ आहेत, अशी टीका केली आहे.
दरम्यान आता विनायक राऊत(Vinayak Raut) यांच्या टीकेला शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शहजिबापू पाटील म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी(MVA) सरकारचा होता ‘नाच्याचा खेळ’ होता, तर विनायक राऊत त्यात नाचत होते का?. शहजिबापुंनी व्हिडीओ जारी करत ही बोचरी टीका केली आहे.
पुढे शहाजिबापू म्हणाले की, विनायक राऊतांच्या प्रत्येक मुद्द्याला त्यांच्या मतदारसंघात जाऊन सात तालुक्यात सात सभा घेऊन मी सडेतोड उत्तर देणार आहे.कोकणातदेखील माझी भाषणं ऐकण्यासाठी विनायक राऊतांनी त्यांच्या कानातला मळ काढून ठेवावा” अशी टीकाही शहाजीबापू पाटलांनी यावेळी केली.
“आज सांगोला येथे खासदार विनायक राऊत यांनी उरल्या-सुरल्या तुटपुंज्या शिवसेनेची सभा घेतली. जिथे शिवसेनेची लाखोंच्या संख्येत मेळावे भरवण्याची ताकद होती, तिथे विनायक राऊतांवर ५०-६० टुकार पोरांच्यात मेळावा घेण्याची वेळ आली आहे, अस देखील शहाजीबापू पाटील म्हणाले.