प्रसिद्ध असणाऱ्या गोष्टींची स्वतःची अशी एक वेगळी खासियत असते. त्या एका वेगळ्या खासियत मुळे ती गोष्ट खास होऊन प्रसिद्ध होते. लोकांना त्या गोष्टींना ऐकण्यात, त्यांना पाहण्यात एक वेगळीच उत्सुकता वाटते. भारतातील काही रेल्वे स्थानके देखील अशीच प्रसिद्ध आहेत.
लहान मुलाच्या स्वप्नपूर्ती साठी राहुल गांधींचा पुढाकार; इंजिनीअर व्हायचे म्हणताच दिली लॅपटॉपची भेट!
भारतीय रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची व आशियातील दुसऱ्या क्रमांकाची रेल्वे आहे. या रेल्वे नेटवर्क मधील काही स्थानके ही जगभरात प्रसिद्ध आहेत. यामध्ये मुलुंड रेल्वे स्टेशन, चित्तूर स्टेशन, बरोग स्टेशन यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेता प्रसाद ओकने दिली माहिती
मुंबई मधील मुलुंड रेल्वे स्टेशन हे भीतीदायक रेल्वे स्थानक समजले जाते. याठिकाणी रात्रीच्या वेळी येण्यास लोक प्रचंड घाबरतात.कारण येथून संध्याकाळच्या वेळी ओरडण्याचे, किंचाळण्याचे व रडण्याचे आवाज येतात.
यानंतर हिमाचल प्रदेश येथील बरोग स्टेशन ( Barog Station) हे दुसरे भयानक स्टेशन आहे. या स्टेशनवर रात्रीच्या वेळी भूत दिसतात असे सांगितले जाते. येथील एक कथा देखील प्रसिद्ध आहे. ब्रिटिश ऑफिसर कर्नल बरोद यांनी या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तेव्हापासून या रेल्वे स्थानकावर त्यांचे भूत फिरत असल्याचे म्हंटले जात आहे.
काटामारीला बसणार आळा; साखर आयुक्तांनी कारख्यान्यांना दिले ‘हे’ आदेश
चित्तुर रेल्वे स्थानकाची ( Chittur Railway Station) देखील अशीच काहीशी कथा आहे. हरिसिंग नावाचा सीआरपीएफ अधिकाऱ्यावर या ठिकाणी आरपीएफ जवान टीटीने हल्ला केला होता. या हल्ल्यात हरिसिंग ठार झाला परंतु, त्याचा आत्मा आजदेखील न्यायासाठी भटकत आहे. यामुळे याठिकाणी फारसे कुणी फिरकत नाही.
सरकारची मोठी घोषणा! छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणणार