
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव व पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. शुक्रवारी (दि.17) झालेल्या या निर्णयाने मागील साठ वर्षांचे ठाकरे व शिवसेना हे समीकरण संपुष्टात आले आहे. यामुळे ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला आहे. दरम्यान ठाकरेंसमोरील अडचणी थांबायच नाव घेतच नाहीयेत. निवडणूक आयोगाने दिलेला धक्का, ठाकरे गटातील नेत्याने दिलेला धोका यानंतर आता ठाकरेंसमोर आणखी एक नवे आव्हान उभे राहिले आहे.
युवा शेतकऱ्याची कौतुकास्पद कामगिरी! गव्हाच्या पिकातून साकारली ‘शिवप्रतिमा’
ठाकरे गटाला अलीकडेच देण्यात ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आले होते. या मशाल चिन्हावर समता पार्टीने दावा केला आहे. यासाठी समता पार्टी सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे. याबाबत समता पार्टीचे (Samta Party) राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी माहिती दिली आहे. आम्हाला शिवसेनेच्या अंतर्गत वादाशी काही देणेघेणे नसून आम्हाला आमचं ‘मशाल’ चिन्ह हवे आहे. असे देखील उदय मंडल म्हणाले आहेत.
“…म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराज”, काय म्हणाले उदयनराजे भोसले?
शिवसेनेचा जो अंतर्गत वाद होता; तो आता निकालात निघाला आहे. पक्षाचे चिन्ह व पक्षाचे नाव हे आता शिंदे गटाला मिळाले आहे. त्यामुळे आमचे चिन्ह का अडकवून ठेवलय? असा प्रश्न उदय मंडल यांनी उपस्थित केला आहे. आमचे चिन्ह इतर कोणत्या पक्षाला देऊ नका. आमचे चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे. यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टाची पायरी चढणार आहोत. शिवसेनेचा अंतर्गत वाद सुरू असताना २०२२ मध्ये आम्हाला हे चिन्ह मिळाले होते, अशी माहिती उदय मंडल यांनी दिली आहे.
“त्यांनी जनाची नाही मनाची तरी ठेवावी”; अजित पवारांनी भाजपला धारेवर धरले