
मुंबई : ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाला. ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ ( Dharmaveer) हा सिनेमा रिलीज होऊन बरेच दिवस उलटले.१३ मे २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. तरीही या सिनेमाच चर्चा जोरातच चालू आहे.या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde)यांनी केलं आहे तर अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak ) याने साकारलेली आहे. दरम्यान आनंद दिघेंची भूमिका सर्वांच्याच मनावर घर करून गेली.
काल रविवारी (21ऑगस्ट )संध्याकाळी हा सिनेमा झी मराठीवर प्रदर्शित झाला. झी मराठीवर ‘धर्मवीर’ चित्रपट प्रदर्शित होणार यानिमित्त प्रसाद ओक यांनी या सिनेमाच्या अनेक आठवणी सांगितल्या. या आठवणी सांगतानाच काही व्हिडीओ झी मराठीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडीओत प्रसाद ओक ‘धर्मवीर’ आणि दिघे साहेबांबद्दल भरभरून बोलतोय.
Anupam Kher: “तुम्ही आधी…..” , लाल सिंग चड्ढा फ्लॉप होताच अनुपम खेर यांनी आमीरला खडसावले
दिघे साहेबांची गोष्ट खोटी वाटावी इतकी खरी
प्रसाद ओक म्हणाला की , दीर्घ साहेबांची गोष्ट खोटी वाटावी इतकी खरी आहे. कारण जेव्हा दिघे साहेबांबद्दल गुगलवर सर्च केलं की एक म्हणजे सिंघानिया रूग्णालय आणि त्यानंतरच्या एक दोन गोष्टी एवढंच समोर येतं. ते सर्व पुसलं जावं आणि त्यांचं महान कार्य, त्यांचं काम किती मोठं आहे हे लोकांसमोर यावं. अनेक लोकांशी बोलून जेव्हा दहा-दहा बारा लोकांकडून एक किस्सा पुन्हा पुन्हा सांगितला जायचा, तेव्हा तो किती खरा आहे याची खात्री पटायची आणि तेच दाखवलं आहे. चित्रपटात दाखवलेल्या सर्व घटना या खऱ्या आहेत, असं प्रसाद ओकने सांगितलं.