Site icon e लोकहित | Marathi News

ST Mahamandal । भारीच! खिशात एकही रुपया नसताना करता येणार लालपरीने प्रवास, कसं ते जाणून घ्या

ST Mahamandal

ST Mahamandal । देशात महागाई (Inflation) वाढत चालली आहे. त्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol and Diesel Prices) गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे खासगी वाहनांनी (Private vehicles) प्रवास करणे प्रत्येकाला परवडत नाही. अनेकजण लालपरीने प्रवास करतात. कमी खर्चिक असल्याने आणि आरामदायी असल्याने लालपरीने (ST Mahamandal Bus) अनेकजण प्रवास करतात. काहीवेळा प्रवाशांकडे सुट्टे पैसे नसतात, त्यावेळी प्रवाशांना प्रवास करणे मुश्किल होते.

Pune News । पर्यटन बेतलं जीवावर! तरुणाचा १२०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू

सध्या सगळीकडे ऑनलाइन व्यवहार (Online transactions) सुरु झाले आहेत. यामुळे अनेकजण खिशात पैसे ठेवत नाहीत. अशातच आता राज्य परिवहन महामंडळ (ST Corporation) आता डिजिटल होऊ लागले आहे. पुणे विभागात चौदा आगारात डिजिटल सुविधा सुरु करण्यात आली आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. महामंडळाने मोठ्या शहरामध्ये स्लीपर कोच बस चालू केल्या आहेत.

Mahadev Betting App । मोठी बातमी! महादेव बेटिंग ॲपच्या मालकाला पोलिसांकडून अटक

महामंडळाच्या बसमध्ये आता क्यूआर कोडची सुविधा सुरु केली आहे. यामुळे सुट्ट्या पैशांची समस्या कायमची मिटेल. प्रवाशांना आता महामंडळाच्या निर्णयामुळे ऑनलाईन तिकीट काढून बस प्रवास करता येईल. तसेच कार्ड स्वॅप करुन तिकीट देण्याची पद्धत लवकरच सुरु केली जाणार आहे. यापूर्वी पुणे शहरात पीएमपीएमएलने ही सुविधा सुरु केली होती. पुणे विभागात १८ ते २० हजार पेमेंट ऑनलाईनच्या माध्यमातून जमा होऊ लागले आहेत.

Ravindra Berde । सिनेसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन

Spread the love
Exit mobile version