मुंबई : बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ (Dimple girl)म्हणजेच अभिनेत्री प्रिती झिंटा ही तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांना आजही भुरळ पडते. प्रितीच मनमोहक हास्य अनेकांना आजही घायाळ करत आहे.प्रिती झिंटा(priti zinta) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.दरम्यान तिने नुकतंच अमेरिकेत(america) केलेल्या जन्माष्टमीच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Thane : ठाण्यात दहीहंडी फोडताना तब्बल ६४ गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरू
विशेष म्हणजे हा व्हिडीओ(video) सध्या जोरदार व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने अमेरिकेत कृष्णाची पूजा कशी होते हे सांगितलं आहे. महत्वाची बाब म्हणजे चाहत्यांनी अभिनेत्री विदेशात राहूनदेखील आपली संस्कृती जपत असल्याने तिचं कौतुक केलं आहेत.
Vinayak Mali : युट्युबचा शेठ विनायक माळीने चाहत्यांना पाडली भुरळ ; वाचा सविस्तर
शेअर केलेल्या व्हिडीओत प्रितीनं यामध्ये पिवळा चुडीदार परिधान केला असून डोक्यावर ओढणी परिधान केली आहे.या पारंपरिक लुकमध्ये प्रिती मनमोहक दिसत आहे.विशेष म्हणजे पती जीनसुद्धा प्रितीसोबत कृष्णाची पूजा करताना दिसून येत आहे.
तसेच प्रीती झिंटासह कृष्णाचा जन्मोत्सव साजरा करताना अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.भारतातच नव्हे तर जगभरात कृष्ण जन्माष्टमीचा सण उत्साहात साजरा झाला.
Bhagatsinh Koshyari : राज्यपाल कोश्यारी लातूर दौऱ्यावर, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला