हिरडगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदी दिपाली दरेकर यांची बिनविरोध निवड

Shrigonda News

श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या हिरडगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत दिपाली दरेकर यांची बिनविरोध निवड झाली. नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे जनरल महिलेसाठी राखीव आहे! सौ.सुनिता अनिल दरेकर ह्या या पदावर विराजमान झाल्या होत्या सुमारे अडीच वर्षांनंतर मनाचा मोठेपणा दाखवून इतरांनाही संधी मिळावी या उदात्त हेतूने त्यांनी स्वतः होऊन राजीनामा दिला आणि आज सौ.दिपाली नाना दरेकर यांची बिनविरोध निवड झाली.

Uttarkashi Tunnel Rescue । दिलासादायक बातमी! बोगद्यात अडकलेले ४१ मजूर लवकरच बाहेर येणार

दिपालीच्या मागे खंबीरपणे उभे राहीलेले सदस्य श्री. चिमाजी आप्पा दरेकर विद्यमान उपसरपंच श्री.अमोल विलास दरेकर सदस्य, सौ. सुनिता अनिल दरेकर माजी सरपंच व विद्यमान सदस्य,सौ. विद्या रामदास बनकर सदस्य, हे सर्व घडामोडी पार पाडण्यासाठी अनेक ज्ञात, अज्ञात हातांनी मदत केली! विशेषतः सोसायटीचे चेअरमन झुंबराव दरेकर सामाजिक कार्यकर्ते संपत आण्णा दरेकर, कुकडी सल्लागार समितीचे सदस्य श्री.मिलीद दादा दरेकर, युवा नेते श्री, संतोष दरेकर श्री सुभाष दरेकर,श्री रामदास बनकर, श्री. ईश्वर दरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

सावधान! तुमचे Google खाते शुक्रवारी बंद होऊ शकते, हे काम त्वरित करा

विद्यमान पंचकमीटीचे हातुन गावचे विकासात भर पडो अशी सदिच्छा व्यक्त करतो! काष्टी सेवा सोसायटीचे माजी मॅनेजर बाळासाहेब दरेकर, मा सरपंच दत्तात्रय भुजबळ, ज्ञानदेव दरेकर साहेब खरेदी विक्री संघाचे संचालक भरत भुजबळ, सोसायटीचे व्हायचेअरमन कैलास दरेकर व सर्व संचालक मंडळ व हिरडगाव च्या ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन केले.

Himachal Pradesh Weather । मोठी बातमी! हिमाचल प्रदेशातील उंच भागात बर्फवृष्टी, पाहा Video

Spread the love