आईवडील मुलांचे सगळे लाड पुरवत असतात. मुलांना हवी ती गोष्ट मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र, बऱ्याचदा मुलांचे लाड करण्याच्या नादात पालक चुकीचे निर्णय घेतात. याचे परिणाम देखील त्यांना सहन करावे लागतात. नुकतीच बारामतीमध्ये ( Baramati) या संदर्भात घटना घडली आहे. अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवायला दिल्याने चक्क पालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
शिक्षकांना ‘सर’ ‘मॅडम’ संबोधने होणार बंद; सरकारचा मोठा निर्णय!
बारामतीमध्ये कॉलेज व महाविद्यालयात येणारे विद्यार्थी अल्पवयीन असून देखील दुचाकी चालवताना दिसून येतात. या मुलांकडे गाडी चालवण्याचा परवाना नसताना देखील पालक त्यांना गाडी चालवण्यासाठी परवानगी देतात. यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विद्यार्थ्यांवर कारवाई केल्यास फारसा फरक पडत नाही. म्हणून त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांत बारामती मध्ये 18 मुलांच्या पालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक अधिनियम अन्वये हे खटले दाखल करण्यात आले असून मुलांच्या पालकांना कमीत कमी 5 हजारांचा दंड होणार आहे.
पुणे शहराच्या नामांतराबाबत अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
बारामती वाहतूक शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापुढे देखील अशी कारवाई केली जाणार असल्याची माहिती बारामती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमध्ये पोलीस अधिकारी (Police officers) व वाहतूक शाखेतील पुरुष व महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
मोठी बातमी! भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा घेणार निवृत्तीची