मुंबई : आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आपला आवडता कलाकार कुठेही दिसुद्या चाहते नेमही त्याला भेटण्यासाठी उत्सुक असतात. आता असाच एक आगळावेगळा किस्सा अभिनेता अक्षय कुमारसोबत घडला आहे.
अक्षय कुमार दिग्दर्शक आनंद एल रॉय यांच्यासोबत विमानतळावर दिसला. तो त्याच्या गाडीकडे जात असताना एका महिलेने त्याला पाहिले. महिलेने अक्षय कुमारला पाहताच ती खूप आनंदी झाली. तिने लगेचच अक्षयला येऊन किस केलं. अचानक महिलेने किस केल्यामुळे अक्षय कुमार देखील आश्चर्यचकित झाला.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आपल्या चाहतीला दिलेली उत्तम वागणूक पाहून नेटकऱ्यांनी देखील अक्षयचं कौतुक करत आहेत. ही महिला वृद्ध असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये अक्षयने काळ्या रंगाचं टी-शर्ट, पँट आणि त्याच रंगाची टोपी परिधान केली असल्याचं दिसत आहे.