नाशिक: नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेअंतर्गत 1 नोव्हेंबरपासून दिव्यांगांना मोफत प्रवास सुरू करण्यात येणार आहे. चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या प्रवाशांसाठी मोफत पास योजना लागू केली जाणार आहे. तसेच ६५ टक्के किंवा ६५ टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग व मोफत प्रवासाचा पास असल्यास सोबत असणाऱ्या प्रवाशालाही तिकिटात ५० टक्के सवलत मिळार आहे.
कैद्यांसाठी आनंदाची बातमी! आता कारागारगृहातही ठेवता येणार शारीरिक संबंध
यासाठी पास काढताना सिटीलिंक (Citylinc Bus) सिस्टिम मध्ये ६५ टक्के पेक्षा जास्त दिव्यांग (disabled people) असल्याचे अपलोड केलेला पुरावा लागणार आहे. असे नमुद केलेले नसेल तर सोबतच्या प्रवाशाला ही सवलत मिळणार नाही. यासाठी दिव्यांगांना सिटीलिंकच्या अधिकृत पास केंद्रावरून सिटीलिंकचा मोफत प्रवासाचा पास काढावा लागणार आहे.
Engineering: राज्य सरकारचा मोठा निर्णय! इंजिनीयरींगचे शिक्षणही आता मिळणार मराठीतून
हा पास काढण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र रहिवासी पुरावा व आधार कार्ड ही कागदपत्रं लागणार आहेत. महापालिका हद्दीतील दिव्यांग प्रवाशांनाच हा पास काढता येणार आहे. १४ ऑक्टोबरपासून सिटीलिंक पास केंद्रावरून हा मोफत पास काढता येणार. १ नोव्हेंबरपासून ते ३१ मार्चपर्यंत पास राहील. एप्रिलपासून पुढील वर्षासाठी पुन्हा नवीन पास काढावा लागणार असल्याची माहिती यावेळी संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.
Taimur Khan: बापरे! तैमूर खानला सांभाळणाऱ्या आयाला मिळतो ‘इतका’ पगार? ऐकून व्हाल थक्क