पुणे लोकसभा जागा वाटपावरून ठाकरे-पवारांमध्ये मतभेद, ठाकरे गटाने केली ‘ही’ मागणी

Disagreement between Thackeray-Pawar over Pune Lok Sabha seat allocation, Thackeray group made 'this' demand

राज्यात लवकरच लोकसभा (Loksabha Election) आणि विधानसभेच्या निवडणूका (Vidhansabha Election) पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रचारासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. परंतु त्यापूर्वी राज्याच्या राजकारणात पक्षफुटीमुळे मोठा भूकंप आला आहे. त्यामुळे आता जनता कुणाला जिंकून देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरेल. महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) निवडणुकीसाठी जागा वाटपावरुन वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

Tomato Rate । शेतकऱ्यांना मोठा धक्का! टोमॅटोच्या किमतीत कमालीची घसरण

पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) बालेकिल्ला मानला जातो. परंतु पक्ष फुटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची ताकद कमी झाली आहे. मागील निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे शिरूर लोकसभेच्या जागेवर निवडून आले होते. परंतु आता ठाकरे गटाकडून या जागेसाठी दावा करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच मावळ लोकसभेवरही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दावा करणार आहे.

Onion Subsidy । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच मिळणार कांद्याचं अनुदान

आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे नेत्यांकडून सांगण्यात येत असले तरीही आता पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या जागेवर ठाकरे गटाकडून दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवारांची त्यांच्याच बालेकिल्ल्यात कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच आता शरद पवार ठाकरे गटाच्या मागणीवर कोणता निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

IMD Weather Forecast । सावधान! पुण्यासह ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Spread the love