सध्याच्या काळात स्मार्टफोनचा वापर (Uses of Smartphone) मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. लहान मुलांपासून तर वयोवृद्ध व्यक्तींच्या हातात तुम्हाला स्मार्टफोन (Smartphone) पाहायला मिळेल. प्रवास करताना, जेवण करत असताना किंवा इतर कोणतीही कामे सुरु असताना अनेकजण स्मार्टफोनमध्येच मग्न असतात. स्मार्टफोनमुळे जग जरी जवळ आले असले तरी त्याचे दुष्परिणाम आत्ताच्या पिढीवर होत आहेत. (Latest Marathi News)
Tomato Price । टोमॅटोच्या किमती पुन्हा कोसळणार? येत्या काळात कसे असेल बाजाराचं चित्र, जाणून घ्या
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अनेक शाळांमध्ये शिक्षक मुलांना शिकवण्याचे सोडून स्मार्टफोनचं पाहत बसतात. त्यामुळे शाळांची गुणवत्ता कमी होत चालली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेता आता कोल्हापूरमध्ये एक कडक नियम करण्यात आला आहे. येथील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना वर्गात स्मार्टफोन नेता येणार नाही. (Ban on Smartphone)
Weather forecast । नागरिकांनो.. काम असेल तरच बाहेर पडा, ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार मुसळधार
इतकेच नाही तर हे शिक्षक चालू वर्गात नको त्या साइट्स पाहत बसतात. त्यामुळे अनुचित प्रकार घडल्याचे समोर आले आहे. शाळांची ढासळलेली गुणवत्ता पुन्हा जैसे थे व्हावी आणि शिक्षकांना शिस्त लागावी, यासाठी आता शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी त्याबाबत एक महत्त्वाचा आदेश काढला आहे. वर्गामध्ये शिक्षक स्मार्टफोनवर बोलताना सापडला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
Manipur Violence | मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडका! हल्ल्यात आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू
तसेच, आता या शिक्षकांना वर्गात जात असताना त्यांचा फोन पार्किंगमध्ये जमा करावा लागणार आहे. या निर्णयामुळे शिक्षकांना आता तरी शिस्त लागेल अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे असा निर्णय घेणारा कोल्हापूर पहिला जिल्हा आहे.