Women Reservation Bill 2023 । नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी संसदेचं विशेष अधिवेशन (Convention) सुरु झालं आहे. आजच्या संसदेतील कामकाजावर संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. कारण महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) लोकसभेत मांडण्यात आले आहे. आज या महिला आरक्षण विधेयकावर तब्बल 7 तास चर्चा होणार आहे. त्यामुळे आता या विधेयकावरून सरकारची चांगलीच कोंडी होऊ शकते. (Latest Marathi News)
Social Media । काय सांगता? सोशल मीडिया वापरासाठी आता वयाची अट? हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
दरम्यान, या विधेयकावर (Reservation Bill) विरोधकांकडून काय मुद्दे मांडले जातात, सरकारही या मुद्द्यांना कसे खोडून काढणार? परिसीमन आणि जनगणनेच्या मुद्द्यावर सरकारचे मत काय? जर विधेयक पास झालं तर कधी लागू होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या विधेयकामध्ये लोकसभा आणि राज्याच्या विधानमंडळांमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षण देण्याची तरतूद केली आहे.
असे लागू होणार विधेयक
महिलांना जनगणना आणि परिसीमनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरक्षण मिळेल. देशात 2021मध्ये जनगणना होणार होती. परंतु कोरोनामुळे ती होऊ शकली नाही. आता पुढे ही जनगणना 2027 किंवा 2028 मध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या जनगणनेनंतरच परिसीमन होईल आणि त्यानंतर हे विधेयक लागू होऊ शकते. वास्तविक वाढत्या लोकसंख्येच्या आधारे योग्य प्रतिनिधीत्व मिळावे आणि सर्वांना समान अधिकार मिळण्यासाठी परिसीमन केले जाते.