चर्चा तर होणारच! हौशी बापाने मुलाच्या वाढदिवसानिमित्त वेरना कारचा केक बनवला; केकचे वजन तब्बल…

Discussion will happen! Hobbyist dad makes Verna Carr cake for son's birthday; The weight of the cake is...

आपल्या मुलांना सुखी जीवन मिळावे त्यांचे सर्व हट्ट पूर्ण व्हावेत यासाठी आई वडील नेहमी कष्ट करत असतात. एकवेळ आईवडील स्वतःसाठी काही घेणार नाहीत मात्र आपल्याला मुलांना कोणतीही गोष्ट ते कमी पडू देत नाहीत. आपल्या मुलांना सर्व गोष्टी मिळाव्यात यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत असतात. सध्या सोशल मीडियावर एका मुलाच्या वाढदिवसाची जोरदार चर्चा चालू आहे.

‘या’ गावात होळी दिवशी घडली होती मोठी दुर्घटना, म्हणून ७० वर्षांपासून खेळली जात नाही होळी; वाचा सविस्तर

वाढदिवसाची चर्चा होण्यामागचं कारण असं की, एका हौशी बापाने आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त वेरना कारचा हुबेहूब केक बनवला आहे. दोन वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त वसईतील आई-बापाने त्याचा आवडीचा कारचा केक बनवला आहे. हा केक 221 किलो वजनाचा असून केकच्या इंडस्ट्रीमध्ये प्रथमच ऐवढा मोठा केक बनवण्यात आला होता. त्यामुळे सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय ठरत आहे.

सनी देओलने अहमदनगरमधील शेतकऱ्यासोबत मारल्या गप्पा; पाहा VIDEO

या केकचा वजन तब्बल 221 किलो आहे त्यामुळे या केकेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या आईवडिलांनी मागच्या वर्षी देखील त्यांच्या चिमुकल्याचा दणक्यात वाढदिवस साजरा केला होता. त्याच्या पहिल्या वाढदिवसाला त्यांनी हॅलिकॉप्टरमधून मुंबईहून वसईच्या कामण इथे एन्ट्री घेतली होती. त्यावेळी देखील ते खूप चर्चेत होते.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे लवकरात लवकर पंचनामे करा; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *