Site icon e लोकहित | Marathi News

घृणास्पद! आदिवासी तरुणाच्या चेहऱ्यावर भाजप नेत्याने केली लघुशंका, व्हिडीओ व्हायरल

Disgusting! BJP leader casts doubt on tribal youth's face, video goes viral

सध्या एक अतिशय घृणास्पद घटना समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका गरीब तरुणाच्या चेहऱ्यावर लघवी करत असल्याचे दिसत आहे. हा धक्कादायक प्रकार मध्यप्रदेश या ठिकाणी घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आम्ही शरद पवार यांच्यासोबत, इंदापूरमधून दुसरी भूमिका जाहीर

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच काँग्रेसने (Congress) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माहितीनुसार, ही घटना मध्य प्रदेशमधील सीधी जिल्ह्यातील असून या ठिकाणी एक मद्यधुंद व्यक्ती आदिवासीतरुणाच्या चेहऱ्यावर लघुशंका करत आहे. सोशल मीडियावर हा व्यक्ती भाजप नेता व आमदाराचा जवळचा कार्यकर्ता असल्याचे असल्याचे बोलले जात आहे.

LPG Cylinder Price । एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर! तुमच्या खिशाला झळ बसणार का? पहा

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी आरोपीवर कडक कारवाईचे आदेश देखील दिले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. त्या आरोपीला अटक व्हावी अशी मागणी सर्वजण करत आहेत.

सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत घेतला भाजप सोबत जाण्याचा निर्णय, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

Spread the love
Exit mobile version