Ganpat Gaikwad Firing । भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यासह अन्य शिवसैनिकांवर गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली असून संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेनंतर गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. (Latest marathi news)
Gautami Patil । गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा हुल्लडबाजांचा राडा, दगडफेकीमध्ये तरुण झाला जखमी
जमिनीवरुन असणाऱ्या या वादाचे कारण राजकीय देखील आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ (Kalyan East Assembly Constituency) हा या वादाचे मोठे कारण आहे. कारण या मतदार संघामध्ये मागील पंधरा वर्षांपासून गणपत गायकवाड यांची सत्ता आहे. त्यांना मात देण्यासाठी सध्या शिवसेनेकडून (Shivsena) जय्यत तयारी सुरु आहे. यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक महेश गायकवाड देखील जोरात प्रयत्न करत आहेत. (Ganpat Gaikwad vs Mahesh Gaikwad)
यामुळे गणपत गायकवाड अस्वस्थ झाले. गणपत गायकवाड हे दोन वेळा कल्याण पूर्वमधून अपक्ष निवडून आले असून सत्ता बदल असल्याने ते राष्ट्रवादीत गेले. पुन्हा २०१९ ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवली. शिवसेनेकडून कल्याण पूर्व मतदार संघावर लक्ष केंद्रीत करून मागील दोन वर्षापासून महेश गायकवाड यांनी या भागातील नागरी समस्या, विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी काम सुरु केले. शिवसेनेचे ते माजी नगरसेवक होते. खासदार शिंदे यांचे सहकार्य त्यांना मिळत असल्याने महेश गायकवाड यांच्या कामांची चांगलीच चर्चा होऊ लागली होती. याच कारणामुळे गणपत गायकवाड अस्वस्थ झाले.