Lok Sabha Election । राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election 2024) पार पडणार आहेत. यंदा निवडणुका अटीतटीच्या होणार आहे. कारण शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली आहे. दोन्ही पक्षांचे दोन गट पडले आहेत. या निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. अशातच आता महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. शिंदे-भाजपचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. (Latest Marathi News)
Mumbai Crime । संतापजनक! ४ वर्षीय चिमुकलीवर वर्गातच शाळेच्या वॉचमनकडून अत्याचार
राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असताना जळगाव लोकसभेच्या जागेवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये (Shinde vs BJP) वाद होण्याची शक्यता आहे. भाजप (Bjp) आणि शिंदे गटांमध्ये जळगावात स्थानिक पातळीवर जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, या मतदारसंघांत तीन आमदार शिवसेना शिंदे गटाचे तर 15 पंचायत समित्या या शिवसेना शिंदे गटाकडे आहेत.
Divorce । चर्चा तर होणारच! आफ्रिकन पोपट परत दिला तरच घटस्फोट देईल, पत्नीकडे पतीची गजब मागणी
त्यामुळे साहजिकच वरिष्ठ पातळीवरून जळगाव लोकसभेची जागा शिंदे गटाला मिळेल. आम्ही आतापर्यंत युतीधर्म पाळला असून आता भाजपने आम्हाला मदत करावी, असं वक्तव्य शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील (Nilesh Patil) यांनी केले आहे. अशातच भाजपचे आमदार सुरेश भोळे (Suresh Bhole) यांनी देखील जळगाव लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे आता वरिष्ठ काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Pune Crime । पुणे तिथे काय उणे! गुन्हा केलेल्या ठिकाणीच पोलिसांनी गुन्हेगारांना घडवली अद्दल