दौंड : आपल्याला माहित आहे की, दिवाळी (Diwali) जवळ आली की सर्वजण बोनसची (bonus) वाट पाहतात. यंदाच्या दिवाळीला काय बोनस मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असते. यामध्येच आता खडकी येथील सुभाष आण्णा कुल दूध उत्पादक संघाचे श्री गणेश सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या वतीने दिवाळीनिमित्त दूध उत्पादकांना साखर वाटप करण्यात आहे आहे.
घरच्या घरी सोप्या पद्धतीने मुरघास कसा तयार करावा? वाचा सविस्तर माहिती
दिवाळीनिमित्त संस्थेच्या सर्व सभासदांना ०५ किलो साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर ५० पैसे प्रति लिटर बोनस देखील मिळाला आहे. यावेळी मा.जि.प.सदस्य संजय काळभोर यांच्या शुभहस्ते सर्व दूध उत्पादकांना साखर वाटप करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या साखर वाटप उपक्रमाबद्दल दूध उत्पादकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.