दिवाळी सुरू असतानाच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा दिवाळी (Diwali) होऊ शकते. याच कारण म्हणजे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पेन्शनबाबत (Pension) तोडगा निघाला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. याविषयीचा निर्णय केंद्र सरकार (Central government) लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा (Old Pension Scheme-OPS) लवकरच लाभ मिळण्याची शक्यता आहे.
विद्यार्थिनीचा संघर्ष! फुटपाथवर दिव्याच्या प्रकाशात अभ्यास; पाहा व्हायरल VIDEO
महत्वाची बाब म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून राज्य आणि केंद्रीय कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी आग्रही होते. दरम्यान, त्यात आता केंद्रीय कर्मचाऱ्यांनी बाजी मारली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनच्या या मागणीला मोदी सरकार 2023-2024 मंजुरी देऊ शकते. परंतु अजूनपर्यंत केंद्र सरकारने याविषयी कोणतीही अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही.
Urfi Javed: उर्फी जावेदला पोलिसांचा दणका! पहा नेमकं काय आहे प्रकरण?
पेन्शन योजनेसाठी कर्मचारी भरती करताना 31 डिसेंबर 2003 अथवा त्यापूर्वीच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने या मुद्यावर विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागितला आहे. तसेच केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार का, याविषयी माहिती देताना त्यांनी ही योजना लागू करण्याविषयी कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले होते.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! ई-पीक पाहणीची अट झाली रद्द, आता थेट मिळणार शेतकऱ्यांना मदत