मुंबई : ऑस्ट्रेलियाकडून पहिला सामना गमावल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे. हा सामना एजबॅस्टन येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 होणार आहे. .
कॉमनवेल्थ गेम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इयान रीड यांनी सांगितले की, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीची तिकिटे विकली गेली आहेत आणि भारत-पाकिस्तान सामन्यासाठीही स्टेडियम भरले जाण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. जिथे ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा रोमहर्षक सामन्यात पराभव केला. तर दुसरीकडे, बार्बाडोसविरुद्ध पाकिस्तानचा पराभव झाला. आता पदकाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांना जिंकणे आवश्यक आहे.
हरमनप्री कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत खेळणार आहे, तर पाकिस्तानच्या नेतृत्वाखाली बिस्मा मारूफ खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा सामना करो किंवा मरो चा असणार आहे.
भारत:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), तानिया भाटिया (विकेटकीपर), यास्तिका भाटिया, हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड, सबिनेनी मेघना, मेघना सिंग, स्नेह राणा, रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्तकर, राधा यादव
पाकिस्तान:
बिस्मा मारूफ (कर्णधार), आयमान अन्वर, आलिया रियाझ, अनम अमीन, आयेशा नसीम, डायना बेग, फातिमा सना, गुल फिरोजा, इरम जावेद, कैनत इम्तियाज, मुनिबा अली, निदा दार, ओमामा सोहेल, सादिया इक्बाल, तुबा हसन