प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही सरकारच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांमधील एक योजना आहे. देशातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या हेतूने केंद्र सरकारने ( Central Government) ही योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. या योजनेचा 12 वा हप्ता ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा झाला होता.
बारामती मधील डॉक्टरांवर गंभीर आरोप; हलगर्जीपणा केल्याने बाळाचा मृत्यु झाल्याने कारवाईची मागणी
पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता देशातील सुमारे 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. यावेळी 16 हजार कोटींची रक्कम पाठवली गेली होती. सध्या शेतकरी 13 व्या हप्त्याची (13th installment) वाट बघत आहेत. हा हप्ता फेब्रुवारी च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. मात्र हा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारच्या काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. अन्यथा प्रधानमंत्री किसान योजनेचा ( PM Kisan Yojana) 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही.
‘या’ मोठ्या कंपनीने केली दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ
या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना 13 व्या हप्त्यासाठी जमिनीची नोंद करणे व ईकेवायसी करणे बंधनकारक केले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळच्या कृषी केंद्रात जाऊन जमीन नोंदीची पडताळणी करावी व ईकेवायसी करून घ्यावी. अन्यथा 13 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाहीत.
कांद्याचे दर वाढले! शेतकऱ्यांसाठी आनंद तर ग्राहकांच्या खिशाला कात्री