
तेलकट त्वचेची (oily Skin) समस्या आपल्याला अनेकांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे जर तुमची त्वचा तेलकट असेल तर जास्त त्वचेची काळजी घेण्याची गरज असते. अशावेळी काही घरगुती उपाय वापरून तुम्ही तेलकट त्वचेपासून कायमची सुटका मिळवू शकता. आज आपण त्याच घरगुती उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
का अपयशी ठरत आहेत भारतीय गोलंदाज धावसंख्येचा बचाव करण्यात? समोर आली कारणे..
हे उपाय करा –
तेलकट पदार्थ खाणे टाळा
ज्या लोकांना तेलकट त्वचेची समस्या अशा लोकांनी शक्यतो तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
दिवसातून २ वेळा चेहरा धुवा
दिवसातून कमीतकमी दोन वेळा पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. चेहरा धुण्यासाठी तुम्ही ग्लिसरीन युक्त साबणाचा देखील वापर करू शकता.
मध
मधामध्ये अनेक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे तेलकट त्वचेमध्ये होणार्या पिंपल्सच्या समस्येवर नियंत्रण ठेवतात. यामुळे अधून मधून चेहऱ्यावर मध देखील वापरावा.
टोमॅटो
तेलकट त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी टोमॅटो हा देखील एक उत्तम पर्याय आहे. टोमॅटोमध्ये सॅलिसिलिक ॲसिड असते जे त्वचेतील तेल कमी करण्यास मदत करते.