Site icon e लोकहित | Marathi News

आम्ही महाराष्ट्रात नसून बिहारमध्ये राहतो का.? हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिलेल पत्र व्हायरल

Do we live in Bihar and not in Maharashtra? Hingoli district farmer's letter written in blood to Chief Minister goes viral

मुंबई : धो-धो पावसाने सध्या राज्यात धुमाकूळ घातलाय.या पावसामुळे (havy rain) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (damage)झाले आहे. शेतकऱ्यांचा(farmers) जीव कासावीस झाला आहे. दरम्यान आता एका शेतकऱ्याचे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. हे पत्र (letter) हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनं एकनाथ शिंदेंच्या(CM Eknath Shinde) नावे पत्र लिहिले.या पत्रातून त्याने आपली व्यथा मांडली आहे.

Rohit Pawar: “…म्हणून तरुणांच्या रोजगाराची संधी हुकली”; महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून रोहित पवारांची प्रतिक्रिया

हिंगोली तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. दरम्यान या अतिवृष्टीमुळे ओढे, नाले फुटले आणि संपुर्ण पाणी शेतात शिरलं.यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. दरम्यान शेतकऱ्यांना सरकारर्फे पंचनामे होऊन मदत मिळेल, अशी आशा लागली होती. मात्र येथे काही ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे झाले मदतीची घोषणा झाली, मात्र या शेतकऱ्यांचे गाव यामधून वगळण्यात आले आहे. यामुळे या शेतकऱ्याने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. यामुळे आता मुख्यमंत्री काय उत्तर देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘अशा’ पद्धतीने करा जनावरांचे पालन, मोठ्या आजारांपासून राहतील दूर

शेतकऱ्याने पत्रात काय नमूद केले?

” मुख्यमंत्री साहेब, आम्ही बिहारमध्ये राहतो का? सेनगाव तालुक्यात पेरण्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेक शेतकरी देशोधडीला लागले. सगळे राजकारणात गुंतले होते. सोबत कृषी विभागालाही विसर पडला. सेनगाव तालुक्यातील शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना आपण तीन मंडळे अतिवृष्टीतून नाकारली. मग आम्ही महाराष्ट्रात नसून बिहारमध्ये राहतो का.? साहेब, अधिवेशनात घोषणा केली. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मग हे काय खाजगी कंपनीने नाकी नऊ आणले? जगायचे कसे ते सांगा. अन्यथा अंगात राहिलेल्या बाकी रक्ताने अभिषेक करून आम्ही आमचे जीव सोडून देऊ. अनुदान द्या. असे म्हटले आहे

कांद्याचा बाजारभाव कोलमडला, तरीही राज्यात कंद्याची लागवड मोठ्या प्रमाणात

Spread the love
Exit mobile version