उन्हाळ्यामध्ये सर्वजण आपल्या शरीराचे उन्हापासून संरक्षण करतात. तसेच शरीराची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना देखील करतात. शरीराची काळजी घेण्यासाठी अनेकजन फळांचां ज्युस, थंड पदार्थ व उत्तम डायट (Fruit juice, cold food and good diet) करून शरीराची काळजी घेतात. यामध्ये अनेकजण सब्जाचे (Subja) देखील सेवन करतात. मात्र अनेक लोकांचा गैरसमज असा असतो की सब्जा आणि चिया सिड्स या दोन्हीही एकच आहेत. परंतु या दोन्हींमध्येही फरक असून या दोन्हींचे फायदे देखील वेगवेगळे आहेत.
१. सब्जाच्या बिया या पूर्णपणे काळ्या रंगाच्या असतात. परंतु चिया सीडस मात्र थोड्या करड्या, पांढरट काळ्या, ब्राऊनिश अशा रंगाच्या असून चिया सिड्स आकाराने मोठ्या असतात.
२. सब्जा पाण्यात टाकल्यावर फुगला जातो. परंतु चिया सिड्स पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाणी शोषून घेतात.
कराडमधील तरुणाने ड्रीम ११ मध्ये जिंकले १ कोटी २० लाख रुपये; आई वडील भावुक होत म्हणाले…
३. सब्जाचे उत्पादन भारतात व इतर देशात देखील घेतले जाते. चिया सिड्स या मेक्सिकन असून त्या भारतात आयात केल्या जातात.
४. सब्जाला चव असते व ज्या पदार्थांमध्ये सब्जा घातला जातो त्या पदार्थाचा देखील तुळशीचा सौम्य वास येतो. मात्र चिया सीड्सला स्वतःची चव नसते.
५. सब्जा केसांसाठी फायदेशीर असतो. मात्र चिया सीड्स या वजन कमी करण्यासाठी मदत करतात.
६. सब्जा आहारात घेतल्यामुळे पोटाला थंडावा मिळण्यासाठी त्याचा उपयोग होतो. व तसेच पित्ताचा त्रास देखील जाणवत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आहारामध्ये सब्जाचे सेवन केले पाहिजे
उद्धव ठाकरेंच्या सभेकडे लोकांनी फिरवली पाठ; निम्म्याच्या वर खुर्च्या रिकाम्याच