जुन्या काळात शेतीच्या कामासाठी शेतकरी बैलगाडी वापरत होते. मात्र काळ बदलला आणि तंत्रज्ञानात प्रगती झाली. यामुळे शेतीसाठी ट्रॅक्टर हे यंत्र मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले. ट्रॅक्टरमुळे इतर कृषी यंत्रे देखील शेतकऱ्यांना वापरता येतात. बाजारात विविध कंपनीचे आणि विविध किंमतीचे ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला भरतातील सर्वात महाग ट्रॅक्टर ( Most Expensive tractor) बाबत सांगणार आहे.
अतिक अहमदकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती! कोण होणार या मालमत्तेचा वारस?
भारतातील सर्वात महाग ट्रॅक्टरचे तंत्रज्ञान व किंमत दोन्हीही अगदी थक्क करणारे आहे. IH Optum 270 CVX Modal Tractor असे या ट्रॅक्टरचे नाव आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या ट्रॅक्टरची किंमत सुमारे १.५ कोटी रुपये आहे. IH Optum 270 CVX Modal Tractor आधुनिक तंत्रज्ञानानुसार काम करते. या ट्रॅक्टरचे वजन १०५०० किलो आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्याचे इंजिन सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे.
या ट्रॅक्टरच्या लोड क्षमतेनुसार, तो ११ हजार किलो वजन सहजपणे उचलण्यास सक्षम आहे. या ट्रॅक्टरच्या मदतीने तुम्ही एकाच वेळी शेतीशी संबंधित अनेक वस्तू किंवा धान्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकता. तसेच या ट्रॅक्टरचा टॉप स्पीड प्रति तास ५० किलोमीटर इतका आहे, तसेच याची टर्बो डिझेल इंजिन क्षमता ६.७ लीटर आहे.
Gautami Patil: बैलासमोर लचकत मुरडत नाचली गौतमी! कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क…