गावातील ग्रामपंचायत ( Grampanchayat) हे प्रमुख सरकारी कार्यालय असते. याठिकाणी गावातील सर्वात महत्त्वाची कामे व निर्णय घेतले जातात. सरपंच हा प्रत्येक ग्रामपंचायतींचा प्रमुख असतो. सरपंच म्हंटल की आपल्याला आठवतो तो रुबाब, मान आणि सन्मान! सरपंच हा गावाचा प्रथम नागरिक असतो. गावासंबंधित कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार सरपंचाला असतो. दरम्यान गावासाठी एवढ्या महत्त्वाच्या व्यक्तीचा पगार किती असतो, हे तुम्हाला माहिती आहे का? आज याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. (Salary of sarpanch)
च्युइंगम खाण्याची सवय असेल तर लगेच सोडा नाहीतर…
सरकारकडून सरपंचांना दर दिवसाला १०० रुपये मानधन दिले जाते. म्हणजेच सरपंचाला दरमहा तीन हजार रुपये वेतन दिले जाते. गावातील लोकांच्या संख्येनुसार सरपंचांचा पगार कमी जास्त होऊ शकतो. जेवढी जास्त गावची लोकसंख्या तेवढा सरपंचाचा पगार जास्त असतो. सरपंचाला जास्तीत जास्त ५००० आणि कमीतकमी २५०० ते ३००० पगार असतो. महत्त्वाची बाब म्हणजे सर्व राज्यांमध्ये सरपंचांना समान वेतन दिले जाते.
धक्कादायक! पाच वर्षाच्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू
सरपंच पदाचा कार्यकाल व वयोमर्यादा
सरपंच पदाचा कार्यकाल ५ वर्षांचा असतो. एकदा कार्यकाल संपला की पुन्हा ग्रामपंचायत निवडणूका लागतात. मात्र ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी ठराविक वयोमर्यादा लागते. २१ वर्षापुढील कोणतीही व्यक्ती सरपंचपदासाठी उभी राहू शकते. मात्र यासाठी ८ वी किंवा १० वी पासची शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
मजुराच्या खात्यात १७ रुपयांऐवजी आले १०० कोटी, मग झालं असं काही वाचून तुम्हीही व्हाल थक्क!