भारतात अनेक उद्योगपती श्रीमंत असल्याची माहिती आपल्याला आहे. परंतु, पैसा कमावण्याच्या बाबतीत शेतकरी देखील कमी नाहीत. शेतकरी देखील शेतीव्यवसायातून करोडोंची संपत्ती कमावू शकतात. हे वाचताना तुम्हाला आश्चर्य वाटेल ? मात्र खरंच आपल्या देशातील काही शेतकरी श्रीमंत ( Rich Farmers) शेतकरी म्हणून ओळखले जातात.
मुलांना चॉकलेट वाटणाऱ्या सांताक्लॉजला लोकांनी केली बेदम मारहाण
रामशरण वर्मा हे भारतातील श्रीमंत शेतकऱ्यांपैकी एक ओळखले जातात. ते उत्तर प्रदेशातील ( UP) दौलतपूरचे रहिवासी आहेत. रामशरण वर्मा यांच्याकडे सध्या 200 एकरहून अधिक जमीन आहे. त्यांची वार्षिक उलाढाल दोन कोटींच्या घरात होते. सरकारने 2019 मध्ये रामशरण वर्मा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
तुनिषाच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट समोर; गरोदर असण्याबाबत मोठा खुलासा
राजस्थानच्या जयपूरमधील रमेश चौधरी हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत शेतकरी आहेत. त्यांच्याकडे तीन पॉली हाऊस आणि एक ग्रीन हाऊस आहे. या पॉलीहाऊसमध्ये मुख्यतः टोमॅटो आणि काकडीची लागवड करतात तर ग्रीनहाऊसमध्ये फुलांची लागवड करतात. रमेश चौधरी देखील वर्षाला दोन कोटींच्या आसपास उत्पन्न घेतात.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार? सुषमा अंधारे यांचा एकनाथ शिंदेंना इशारा
प्रमोद गौतम या पेशाने इंजिनिअर असणाऱ्या तरुणाने 2006 मध्ये नोकरी सोडून 26 एकरवर शेती करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांनी सुरुवातीला भुईमूग आणि तुरीची शेती केली यानंतर त्यांनी संत्रा, द्राक्षे, केळी, लिंबू, पेरू या फळांची बागायती शेती सुरू केली. यानंतर शेतीत विविध प्रयोग करत प्रमोद यांनी यश मिळवले. सध्या प्रमोद शेतीमधून करोडोंचे उत्पन्न घेत आहेत.
गौतमी पाटीलचे लोकांना भावनिक आवाहन; म्हणाली, “माझे कार्यक्रम बंद करू नका, माझी…”