‘धडाकेबाज’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेला चित्रपट आहे. यामधील पात्रे अजूनही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. यातील कवट्या महाकाल या पत्राचे गूढ प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. संपूर्ण चित्रपटामध्ये कवट्या महाकालचा मास्क घालून वावरणारा व्यक्ती नेमका कोण होता? असा प्रश्न प्रेक्षकांना कायम पडतो.
सर्वात मोठी बातमी! आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक
महेश कोठारे ( Mahesh Kothare) यांच्या ‘डॅम इट’ या आत्मचरित्राचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. यावेळी त्यांनी ‘धडाकेबाज’ या चित्रपटासंदर्भात बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांनी कवट्या महाकालच्या चेहऱ्यामागच्या माणसाची खरी ओळख सांगितली आहे.
आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ आव्हानांवर एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी छोटे मोठे…”
कवट्या महाकालचे पात्र साकारणारा व्यक्ती महेश यांचा मित्र असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तो महेश कोठारे यांचा जवळचा मित्र होता. मात्र आता तो हयात नाही. तो एक गुजराती अभिनेता होता. त्याचे नाव चंद्रकांत पंड्या असे होते. गुजराती चित्रपट करताना महेश कोठारे व चंद्रकांत पंड्या यांची ओळख झाली होतो. तेव्हा चंद्रकांतकडे काही काम नव्हते.
सिद्धार्थ आणि कियाराचा थाटामाटात पार पडला विवाह सोहळा; पाहा PHOTO
यावेळी त्याने महेश कोठारे यांना काम मागितले. यावर महेश कोठारे म्हणाले की, काम आहे पण संपूर्ण चित्रपटात मास्क घालावं लागेल. चेहरा दिसणार नाही. तरीही तो तयार झाला. महत्त्वाची बाब म्हणजे त्याने खूप छान पद्धतीने ते काम केले आणि ते पात्र खूप गाजले. चंद्रकांत हयात असताना त्याचे नाव कोणालाही कळले नाही. अशी खंत देखील महेश कोठारे यांनी यावेळी व्यक्त केली.
बाळासाहेब थोरातांनी राजीनामा देताच इंदुरीकर महाराजांचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत!