मानसी नाईक ( Mansi Naik) ही मराठी पडद्यावरील गाजलेली अभिनेत्री आहे. अनेक गाण्यांमधून व चित्रपटांमधून चाहत्यांना वेड लावणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. मागील काही दिवसांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यातील घटनांमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. मानसीच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी सुरू झाल्या असल्याची माहिती सध्या समोर येतीये.
तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सफाई कामगाराने केला बलात्कार
काही दिवसांपूर्वी मानसीने तिचा नवरा म्हणजेच प्रदीप खरेरा (Pradip Kharera) याचे फोटो तिच्या सोशल मीडिया हँडल्सवरून डिलीट केले आहेत. इतकंच नाही तर प्रदीपने देखील त्याच्या सोशल मीडिया हँडल्स वरून मानसीचे फोटो डिलीट केले आहेत. याशिवाय मानसीने तिच्या नावासमोरील खरेरा हे आडनाव सुद्धा हटवले आहे. यामुळे मानसी प्रदिपसोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना अक्षरशः उत आला आहे. या पार्श्वभूमीवर मानसीने नुकतेच मौन सोडले असून याबाबत एक पोस्ट केली आहे.
मोठी बातमी! पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राविरोधात पुन्हा एकदा आरोपपत्र दाखल
इंस्टाग्रामवर स्टोरी टाकत मानसी नाईकने एक भावनिक पोस्ट केली आहे. यामध्ये तिने आपल्या आयुष्यात साथ देणारे मित्र नसून मित्रत्वाचा बुरखा पांघरलेले मित्र आहेत असे सांगितले आहे. तसेच माझ्या आयुष्याच्या संदर्भातील माहितीचा गैरउपयोग केला जात आहे. त्यावर कुणीच विश्वास ठेवू नका. असे तिने यामध्ये म्हंटले आहे. या पोस्टमधूम मानसीने अप्रत्यक्षपणे तिच्या घटस्फोटाबद्दल मौन सोडलेले पहायला मिळत आहे.
महत्वाची बातमी! कोरोनातील मयताच्या कुटुंबाला मिळणार कर्जमाफी?
मानसीचा पती प्रदीप याबद्दल जाणून घेतले तर तो एक बॉक्सर तसेच मॉडलदेखील आहे. त्याचबरोबर मागच्या काही त्याचं ‘आग लगेगी’ हे हिंदी गाणं देखील प्रदर्शित झालं होतं. मानसीनेच घटस्फोटाबाबत खुलासे केले आहेत. तिचा प्रदीप याने अजून कोणताच खुलासा केलेला नाही.