शरीर म्हणलं की दुखणं आलंच! बऱ्याचदा किरकोळ आजारांसाठी आपण आजीचा बटवा काढतो. यात हमखास तुळशीचा समावेश असतो. आपल्या दारात असणारी तुळस ही खरंतर एक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदामध्ये तुळशीचे ( Tulsi) अनेक फायदे सांगितले आहेत. तुळशीच्या पानामध्ये व फुलांमध्ये असणाऱ्या गुणधर्मांमुळे अनेक आजार घरच्याघरी बरे होतात.
Airtel च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! फॅमिली प्लॅन लाँच, जाणून घ्या किंमत
अगदी प्राचीन काळापासून वैद्यशास्त्रात तुळशीला विशेष महत्त्व आहे. रोज सकाळी नियमितपणे तुळशीची पाने खाल्ली की पचनशक्ती सुधारते. एवढेच नाही तर तुळशीच्या पानांमुळे स्मरणशक्ती सुद्धा सुधारते. डोकेदुखी पासून आराम मिळवण्यासाठी तुळशीची पाने खातात.
कपल फोटोशूटसाठी सासू-सासऱ्यांनी केली मदत! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क
तुळशीच्या पानाचे इतर फायदे:
1) कानदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुळशीच्या पानाचा अर्क कानात टाकतात.
2) तुळशीची पाने खाल्ल्यास किटाणूंचे संक्रमण, पोटदुखी, ताप, सर्दी, मळमळ व हृदयाशी संबंधित आजारांपासून सुटका होते.
3) तणाव मुक्तीसाठी तुळशीची पाने अधिक परिणामकारक ठरतात.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, मविआ नेत्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून केला निषेध!
तुळशीची फुले सुद्धा तिच्या पनांप्रमाणे गुणकारी असतात. यामध्ये महत्त्वाची रासायनिक तत्त्वे असतात. ज्यामुळे अनेक आजार बरे होतात. तुळशीच्या फुलांत अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे कोणताही आजार अगदी मुळापासून नष्ट होतो.
“…गुन्हा दाखल करून थेट पाकिस्तानला पाठवा”, नितेश राणेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल