भारतात समोसा प्रचंड लोकप्रिय आहे. बहुतेक लोक वडापावनंतर समोश्याला ( Samosa) प्राधान्य देतात. गरमागरम समोसा पाहून कोणाचाही तोंडाला पाणी सुटते. देशातील छोटी मोठी खेडी, गावे व शहरांमध्ये समोसा सहज उपलब्ध होतो. कमी वेळेत व कमी पैशात मिळणारा चटपटीत पदार्थ म्हणून समोसा ओळखला जातो. अत्यंत चवीने खाल्ल्या जाणाऱ्या या समोश्याचा रंजक इतिहास तुम्हाला माहिती आहे का ? ( Interesting History )
आराध्यासाठी बच्चन कुटूंबाने घेतली उच्च कोर्टात धाव; खोट्या बातमीमुळे उचलले ठोस पाऊल
खरंतर समोसा हा एक विदेशी पदार्थ आहे. ( Foreign Food ) अनेक वर्षांपूर्वी मध्यपूर्वेमधून समोसा भारतात आला. इराणी व्यापाऱ्यांमुळे पहिल्यांदाच समोसा भारतात आला. या चटपटीत पदार्थाला फारसी भाषेत ‘संबुश्क’ असे म्हणतात. परंतु, भारतात त्याला बहुतेक ठिकाणी समोसा म्हणूनच ओळखले जाते. एवढंच नाही तर बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये समोश्याला सिंघाडा देखील म्हंटले जाते.
संरक्षणमंत्री कोरोना पॉझिटिव्ह; कोरोना रुग्णांची संख्या वाढली
मध्यपूर्वेमधून समोसा भारतात आला असल्याची आख्यायिका आहे. इराण आणि अफगाणिस्तान येथून प्रवास करत समोसा भारतात आला. इराण ते भारत या प्रवासात समोश्यात अनेक बदल झाले. त्याच्या आकारापासून ते त्यात भरण्यात आलेल्या स्टफिंगमध्ये हे बदल पहायला मिळतात. मध्येपूर्वेतील काही देशात समोशात ड्रायफ्रूड्स घालतात. तर काही देशात मिक्स फळांऐवजी मटण घालतात.
“…तर मला गुंड होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही”; सलमानचे वक्तव्य चर्चेत