पारंपरिक शेतीतून फारसे आर्थिक उत्पन्न भेटत नसल्याने शेतकरी विविध शेतीचे प्रयोग ( Agriculre Experiments) करत असतात. आजकाल महोगनी लागवड जास्त प्रमाणात केली जात आहे. यासाठी लागणारे कमी आर्थिक भांडवल ( Low Production Cost) व कमी कष्टामुळे ही शेती शेतकऱ्यांना सोयीस्कर ठरते. तसेच यातून मिळणारे आर्थिक उत्पन्न देखील मोठे आहे. महोगनीच्या बिया,लाकूड व साली यांना बाजारात मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यातून चांगलाच फायदा होतो.
या चहाची किंमत आहे कोटींच्या घरात; जगातील सर्वात महागड्या चहाबद्दल तुम्हाला माहित आहे का?
महोगनीचे झाड मोठे होण्यासाठी सुमारे बारा वर्षे लागतात. या काळात हे झाड 200 फूट उंचीपर्यंत वाढते. या झाडाचे लाकूड 2000 ते 2200 रुपये प्रति घनफूट विकत घेतले जाते. तसेच महोगनीच्या बियांची किंमत एक हजार रुपये प्रतिकिलो इतकी आहे. महोगनीच्या एक हेक्टर शेतीमधून शेतकरी 70 लाखांपासून एक कोटींपर्यंत पैसे कमावू शकतात.
दुधाच्या दरात पुन्हा वाढ; ‘हे’ आहेत नवीन दर
महोगनीच्या झाडाचे फायदे :
1) महोगनीच्या काड्या लवकर खराब होत नाहीत. त्या टिकाऊ असतात.
2) महोगनी चे लाकूड जहाजे, दागदागिने, फर्निचर, प्लायवुड, सजावट तयार करण्यासाठी वापरले जाते.
3) महोगनीच्या साल आणि पानांमध्ये औषधी गुणधर्म आहेत.
4) शिल्पे तयार करण्यासाठी महोगनी वापरतात.
बिग ब्रेकिंग! पुण्यातील नवले ब्रिज जवळ भीषण अपघात! कंटेनरने २६ गाडयांना उडविले