शेतकऱ्यांना मालामाल करणारी ‘ही’ हळद तुम्हाला माहीत आहे का? प्रति हेक्टरी निघते लाखो रुपयांचे उत्पादन

Do you know 'this' turmeric that makes farmers rich? Production of lakhs of rupees per hectare

नगदी पिकांचे उत्पादन घेण्यावर शेतकऱ्यांचा जास्त कल असतो. ऊस, सोयाबीन, कापूस, अदरक यांच्यासोबत आजकाल हळद लागवडीकडे कल वाढला आहे. राज्यात पिवळ्या हळदीच्या ( turmeric) लागवडीचे क्षेत्र अधिक आहे. मात्र आजकाल काळ्या हळदीच्या लागवडीला देखील चांगलीच पसंती मिळत आहे. बाजारात काळ्या हळदीच्या वाढलेल्या किंमती हे यामागचं सर्वात मोठं कारण आहे.

उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे येणार आमने-सामने; हिवाळी अधिवेशनात येणार वादळ?

काळ्या हळदीचे फायदे

काळ्या हळदीमध्ये ( Black turmeric ) असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे ही हळदी इतकी महाग आहे. तसेच तिचे अनेक फायदे आहेत.

1) आयुर्वेदामध्ये काळ्या हळदीला विशेष स्थान आहे.
2) निमोनिया, खोकला, कॅन्सर इत्यादी रोगांवर काळी हळद परिणामकारक असते.
3) सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी काळ्या हळदीचा वापर होतो.
4) विविध आरोग्यदायी काढ्यांमध्ये काळी हळद वापरली जाते.
5) काळ्या हळदीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

पट्ठ्याने कमालच केली! लाल केळीचा यशस्वी प्रयोग, लाखोंचं उत्पन्न

यामुळे काळी हळद ही खूप महाग असते. याचे उत्पादन कमी होत असल्याने मागणी अधिक असते. म्हणून, कायम तेजीत असणारे पीक म्हणून काळ्या हळदीला ओळखले जाते. ही हळद 800 ते 1000 किंवा त्यापेक्षा जास्त प्रति किलो ने विकली जाते. याचा पुरवठा होण्याइतपत उत्पादन काढल्यास शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो. काळ्या हळदीच्या उत्पादनातून शेतकरी प्रति हेक्टरी लाखो रुपयांचे उत्पादन घेऊ शकतात.

मोठी बातमी! बारामतीमध्ये कोयते आणि तलवार वापरून राडा करणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *