
सोशल मीडियावर नेहमी अजब गजब व्हिडिओ व्हायरल होतात. यामध्ये खादाड मंडळींसाठी देखील अंतरंगी व्हिडिओ असतात. आता नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये स्टिंग मॅगी’चा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आजपर्यंत आपण फंटा मॅगी, चॉकलेट मॅगी, पान मसाला मॅगी, रूह अफजा मॅगी असे मॅगीचे अनेक प्रकार पाहिले आहेत. परंतु स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड एनर्जी पेयासह बनवलेली ही अजब-गजब मॅगी ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
जनावरांची खरेदी-विक्री करा फक्त एका क्लिकवर; खास पशुपालनासाठी नवे अॅप!
एका ट्विटर युजरने @Highonpanipuri या हँडल वरून हा व्हिडिओ शेअर करत ‘सर्व काही संपले, बाय बाय’ असे म्हंटले आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती फ्राईंग पॅन मध्ये मॅगीसाठी पाणी न टाकता स्टिंग ओतते. नंतर त्यामध्ये इन्स्टंट नूडल्स घालते. याशिवाय त्यात मॅगी मॅजिक मसाला, कांदे आणि हिरव्या मिरच्या सुद्धा टाकल्या जातात. हे सगळं झाल्यावर मॅगी ( Viral maggie with Sting) एका वाटीमध्ये ग्राहकाला दिली जात आहे. हा व्हिडीओ 27 हजार लोकांनी पाहिला आहे.
“…म्हणून कार्यक्रम सुरू असतानाच शरद पवार झाले भावूक”; काय झाले असेल? वाचा सविस्तर
Khatam
— harshu 🐼 (@Highonpanipuri) November 15, 2022
Tata Tata
Bye bye😓😓 pic.twitter.com/S66rsmf3fz
या व्हिडीओवर नेटकरी प्रचंड संतापले आहेत. खरंतर मॅगी हा अनेक खदाडांच्या सेंटिमेंट्स चा विषय आहे. परंतु, त्याच मॅगी च्या रेसिपी ची अशी वाट लावल्याने नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर रागात कमेंट केल्या आहेत. यामध्ये मॅगीच्या आत्म्याला शांती मिळो, भूक भागवणाऱ्या मॅगीसोबत असे खेळ नका, मॅगी आता पहिल्यासारखी राहाणार नाही, इश्वरा असे नूडल्स खाण्यासाठी शक्ती द्या अशा कमेंट्स चा समावेश आहे.
बिग ब्रेकिंग! अभिनेत्री तबस्सुम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन