बॉलिवूडचा ऍक्शन हिरो म्हणून सगळीकडेच टायगर श्रॉफचा बोलबाला आहे. उत्कृष्ट डान्स व अभिनयाच्या जोरावर अगदी कमी काळात टायगरने ( Tiger Shrof) बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. 2014 साली हिरोपंती या चित्रपटातून टायगरने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. दरम्यान टायगर श्रॉफ च्या नावाबद्दल सोशल मीडियावर व विविध मुलाखतींमध्ये कायम चर्चा होत असते. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण ‘टायगर’ हे टायगरचे खरे नाव नसून त्याचे खरे नाव आजही अनेक लोकांना माहीत नाही. टायगर श्रॉफचा आज ( ता.2) वाढदिवस आहे. यानिमित्ताने जाणून घेऊ त्याच्या नावाचा एक किस्सा!
टायगरचे खरे नाव हेमंत श्रॉफ असे आहे. मग त्याचे नाव टायगर कसे पडले? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. या प्रश्नाचे उत्तर खुद्द टायगरचे वडील जॉकी श्रॉफ ( Jocky Shorf) यांनी एका मुलाखती दरम्यान दिले होते. टायगर चे ‘टायगर’ असे नाव आपल्यामुळेच पडले आहे. असे जॉकी श्रॉफ यांनी यावेळी मान्य केले.
रामदास आठवलेंच्या पार्टीचा नागालँड मध्ये डंका; विधानसभा निवडणुकीत मिळवला दोन जागांवर विजय
यावेळी ते म्हणाले की, टायगरला लहानपणी सतत चावा घ्यायची सवय होती. यावेळी त्याला मी लाडाने टायगर असे म्हणायचो. मात्र माझे ऐकून सर्वांनीच त्याला टायगर अशी हाक मारायला सुरुवात केली. यामुळेच आज तो सगळीकडे ‘टायगर’ म्हणून ओळखला जातो.