गाड्यांची नवनवीन मॉडेल्स बाजारात सतत येत असतात. भारतात मागच्या काही वर्षांमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रचंड क्रांती झालेली आहे. विविध फिचर्स असलेल्या नवनवीन गाड्यांनी हे क्षेत्र अगदी गजबजून गेले आहे. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, भारतात सर्वात पहिल्यांदा कार खरेदी कोणी केली असेल?
हृतिक रोशन लवकरच अडकणार विवाहबंधनात? लग्नानंतर राहण्यासाठी घेतले नवीन घर
देशातील पहिली कार (India’s First Car) खरेदी करणारा माणूस दुसरा तिसरा कोणी न्हवता तर ते भारतातील औद्योगिक क्रांतीचे जनक जमशेदजी टाटा ( Kamshedji Tata) होते. त्यांनी कोलकत्ता येथे पहिली कार खरेदी केली होती. मात्र टाटांच्या आधी देखील एका माणसाने कार खरेदी केली असल्याचे पुरावे काही ठिकाणी आहेत. तसेच टाटांसोबत आणखी तिघांनी सोबतच कार्स बुक केल्या होत्या.
राखी सावंतच्या आयुष्यावर येणार सिनेमा; चित्रपटाचे नाव वाचून तुमच्याही भुवया उंचावतील
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी म्हणजेच 1900 मध्ये फोर्ड आणि फ्रासिसी या कार कंपनीने डेडियोनची कार बाजारात आणली होती. याबाबत वृत्तपत्रात जाहिरात देखील आली होती. ही जाहिरात निघताच देशातील श्रीमंत लोक कार घेण्यासाठी उत्सुक झाले. मात्र अनेक संदर्भातून लक्षात येते की, फोस्टर नामक व्यक्तीने देशातील पहिली कार खरेदी केली.
“अन् तेव्हा श्रद्धा कपूरने नाकारली होती सलमान खानच्या सिनेमात काम करण्याची संधी”; वाचा खरे कारण
तसेच काही संदर्भातून हे लक्षात येते की, मुंबई मधील चौघांनी डेडियोनची कार बुक करून विकत घेतली होती. जमशेदजी टाटा यामधीलच एक होते. यामुळे देशातील पहिल्या वहिल्या कारचे पहिले मालक म्हणून जमशेदजी टाटा यांना ओळखले जाते.
पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर साधला निशाणा; म्हणाल्या, “चारित्र्यहीन व्यक्ती राजकारणातील व्हिलन…”