मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी बंड पुकारून शिवसेनेचे(shivsena) आमदार फोडले आणि भाजपशी युती केली. यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यामुळे भाजपा (bjp)आणि शिंदे गट विरुद्ध शिवसेना अस चित्र पाहायला मिळत आहे. या दोन्ही बाजूचे एकमेकांवर टीका आरोप करण्यात मागे हटत नाहीत. रोज कोणी ना कोणी टीका करत असत. अमरावती मधील खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी जळगावमध्ये हनुमान चालीसा पठनाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका करताना एकेरी उल्लेख केला होता. त्यामुळे शिवसैनिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान यावरूनच शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंनी (chandrakant khaire) नवनीत राणा विरोधात त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे.
Suresh Raina: सुरेश रैनाने केली क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, कारण…
काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा?
“मी मुंबईची(Mumbai) मुलगी आणि विदर्भाची सून आहे.मी एवढी कमजोर नाही. जर तू शिवसेनावाला उद्धव ठाकरे आहे, तर मीही राणा आहे. तुमच्यात किती ताकद आणि माझ्यात किती ताकद याचा सामना होऊनच जाऊ दे. आम्ही तुम्हाला अशी जागा दाखवली, की तुमच्या घरात उभा राहणारा कार्यकर्ताही उरला नाही”, असं नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.
Salman Khan: सलमानच्या ‘या’ बहुप्रतिक्षीत चित्रपटातील हटके लूक आला समोर; पाहा VIDEO
चंद्रकांत खैरेंचा नवनीत राणेंवर पलटवार
दरम्यान, या मुद्द्यावरून संभाजीनगरमधील शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नवनीत राणांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे. खैरे म्हणाले की, “ती बाई तुम्हाला माहितीये का चित्रपटात कशी सिगरेट पिते फोटो कसे काढते. कसे कपडे असतात. ती बाई काय उद्धव ठाकरेंना बोलणार? ती बाई आम्हाला काय शिकवणार? ती बाई हनुमान चालिसाविषयी आम्हाला शिकवते का?” अशा शब्दांत खैरेंनी प्रश्न उपस्थित केला आहे.
Thackeray-Shinde: अखेर राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंना वर्षा बंगल्यावर भेटणार, कारण…