मागील दोन तीन वर्षापूर्वी एक तरुणी रातोरात स्टार बनली होती. ती तरुणी म्हणजे विंक गर्ल (wink girl) प्रिया प्रकाश वॉरियर. प्रिया प्रकाश ही डोळा मारून सर्वांना घायाळ करायची. प्रियाचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. सगळे तरुण तिच्यावर फिदा झाले होते. प्रिया (Priya Prakash) तिच्या या एका व्हिडिओमुळे (Video) चांगलीच फेमस झाली होती. त्या व्हिडिओमध्ये अस होत की, शाळेत एका मुलाचे आणि मुलीचे एकमेकांना डोळा मारण्याचे इशारे (Wink warnings) चालू असतात.
Accident । भीषण अपघात, बसचा चेंदामेंदा; आयुष्यातील ठरला शेवटचा बस प्रवास; चार जणांचा जागीच मृत्यू
मुलाला पाहून मुलगी अचानक डोळा मारतेआणि ते पाहून मुलगा घायाळ होतो. व्हिडीओतील ती मुलगी म्हणजे प्रिया प्रकाश. दरम्यान याच व्हिडिओमुळे प्रिया प्रकाशला विंक गर्ल हे नाव मिळाले आहे. प्रिया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता पुन्हा एकदा तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिचा बिकिनी लूक जबरदस्त दिसत आहे. त्याचबरोबर समुद्र किनारी धमाल करताना प्रिया प्रकाश ही दिसत आहे. हिचा हा व्हिडीओ मालदीवमधील आहे. प्रिया प्रकाश ही मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यानी अक्षरश कमेंटचा पाऊसच पाडला आहे.