‘चंद्रा’ गाणं गाऊन महाराष्ट्राला वेड लावलेला शाळकरी मुलगा आठवतोय का? आता गातोय चित्रपटातही…

Do you remember the schoolboy who made Maharashtra crazy by singing 'Chandra'? Now singing in movies too...

सोशल मीडिया (Social media) हा असा प्लँटफॉर्म आहे जो एखाद्य व्यक्तीला रोतरात स्टार बनवू शकतो. अशा अनेक गोष्टीत घडल्या आहेत ज्यामुळे अनेक लोक रातोरात सोशल मीडियामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी अहमदनगर (Ahmednagar) मधील एका शाळकरी मुलाचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाळकरी मुलाने स्वतःच्या आवाजामध्ये चंद्रा हे गाणं गायलं होत. यांनतर त्याच गाणं एवढं व्हायरल झालं की त्याच्या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. मागच्या काही दिवसापूर्वी तो शाळकरी मुलगा त्याने गायलेल्या गाण्यामुळे सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत होता.

धक्कादायक! जळगावमध्ये वडिलांवर आणि मुलावर मधमाशांनी केला हल्ला अन् हल्ल्यात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गाणं गाणाऱ्या मुलाचं नाव जयेश खरे (Jayesh Khare) असे होते. त्या व्हिडीओमुळे जयेशचे नशीबच बदलले आहे. जयेशचा व्हिडिओ पाहून खुद्द गायक आणि संगीतकार अजय- अतुलने (Composer Ajay-Atul) त्याची भेट घेऊन आपल्यासोबत काम करण्याची संधी दिली आणि आता त्याचं स्वतःचं गाणं प्रदर्शित झालं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जयेशची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

पुण्यातील भाजपच्या बॅनरबाजीवर अजित पवार यांनी व्यक्त केला संताप; म्हणाले…

बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ (‘Maharashtra Shaheer’) या चित्रपटात जयेशने गाणं गायलं आहे. हा चित्रपट शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित केदार शिंदे दिग्दर्शित आहे. हा चित्रपट येत्या २८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे या चित्रपटातील जयेशचे गाणे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

“…तर गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या” सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *