मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक वादविवाद चालू आहेत. त्यामध्ये आता शिंदे आणि फडणवीस सरकारमधील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी नवीन वादग्रस्त विधान केली. रविवारी जळगावमधील एका कार्यक्रमामध्ये गुलाबराव पाटील म्हणाले, “मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही”.
Amol Mitkari: शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार – अमोल मिटकरी
पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “एक हजार लोकांची ओपीडी होऊन निकाल आठ ते दहा असा दोन तासात लावला. डॉक्टर तरी बरे आमच्यापेक्षा (मंत्र्यांपेक्षा). बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, हृयदरोग तज्ज्ञ, आर्थोपेडिक. स्त्रीरोग तज्ञ असतात. स्त्रीरोग तज्ञ कधी हात-पाय बघत नाही आणि हातपाय बघणारे कधी स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही,”
Ritesh Deshmukh: आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, रितेश देशमुखने केले कौतुक
गुलाबराव पाटलांनी मंत्री आणि डॉक्टरांच्या कामाची तुलना केली आहे. त्याचे हे वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे. “आम्ही तर जनरल फिजिशियन आहोत. आमच्याकडे बायको नांदत नाही तो पण माणूस येतो. आमच एकटं डोकं असतं तर डॉक्टरांचं एकाच फॅकल्टीचं डोकं असतं. असा देखील उल्लेख त्यांनी भाषणात बोलताना केलाय.