मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये होणार आहे. यामुळे विरोधकांकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका होते आहे. यावरून रायकीय नेत्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यामध्येच आता शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधलायं.
‘या’ कारणाने वासरांची वाढ खुंटते; घ्या अशा प्रकारे काळजी
माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र म्हणजे पाकिस्तान आहे का? ज्यामुळे प्रकल्प गुजरातला पळवून लावला. महाराष्ट्राच्या मुलांनी काय चूक केली?, असा प्रश्न करत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. थोर समाज सुधारक संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे यांच्या काल स्मृतिस्थळावर जाऊन आदित्य ठाकरे यांनी अभिवादन केलं.
Heart Attack: शरीरावर ‘ही’ लक्षण जाणवतात? सावधान येऊ शकतो हार्टअटॅक
मुख्यमंत्र्यांनी २६ जुलैला सभागृहात सांगितलं होत की, वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात येणार असून, 4 लाख कोटी घेऊन येणार आहेत. एमआयडीसीच्या मॅगझीनमध्ये सांगितलं की एक लाख कोटी घेऊन येणार आहेत. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे 29 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनिल अग्रवाल (Anil Aggarwal) यांची भेट झाली. ही भेट लहान भावाला प्रकल्प देण्यासाठी झाली का?, असा प्रश्नही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय.