ब्रेस्ट कॅन्सर बद्दल तरुणींच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न असतात. या कॅन्सर संबंधीचे तुम्ही अनेक अफवा ऐकल्या असतील, त्यामधील काही अफवा खऱ्या देखील वाटतात, काही वेळा पुरेशी माहिती नसल्यामुळे आपल्या मनात शंका येन साहजिकच आहे, जेव्हा अशा अफवा किंवा माहिती वाचत असतो तेव्हा आपल्या मनात स्तनांसंबंधी किंवा कॅन्सर बद्दलचे विचार येतात, कधी कधी असं वाटतं आपण घातलेली ब्रा कॅन्सरचे कारण बनु शकते का?
धक्कादायक! श्रीगोंद्यात गॅस लिकेज होऊन घराला आग; वाचा सविस्तर
ब्रेस्ट कॅन्सर (Breast cancer) संबंधीचा असाच एक मेसेज सोशल मीडियावर (Social Media) वायरल होत आहे. त्या मेसेज मध्ये असे लिहिले आहे की “काळया रंगाची ब्रा घातल्याने कॅन्सरचा धोका वाढतो.” त्या मेसेजमुळे अनेक तरुणींनी काळया रंगाची ब्रा (Bra) घालणे बंद केले. त्याशिवाय असाही दावा केला गेलाय सूर्यकिरणे थेट स्तनांवर पडल्यास स्तनांचा कर्करोग हा आजार वाढतो. त्यामुळे उन्हात जाण्यापूर्वी आपले स्तन ओढणीने किंवा इतर कपड्याने झाकले पाहिजे.
Viral Video: भर मंडपात नवऱ्यानेच लावला बायकोचा सेक्स व्हिडीओ
पण या प्रकरणात नक्की काय तथ्य आहे हे तज्ञ डॉक्टरांकडून जाणून घेऊयात,,,,,
ही केवळ अफवा आहे असे डॉक्टरांचे मत आहे. खरंतर ब्रा च्या रंगामुळे कर्करोग होईल की नाही याने काही फरक पडत नाही, त्यामुळे तुम्हाला ज्या रंगाची ब्रा आवडते ती तुम्ही घालू शकता, तसेच स्तनांच्या कर्करोगाबद्दल बोलताना डॉक्टर तान्या म्हणाल्या काळया रंगाची किंवा गडद रंगाची ब्रा घातल्याने तुम्हाला स्तनाचा कर्करोग होऊ शकतो का? अनेकदा तुम्ही हे ऐकले असेल आणि इतरांना सांगितलं देखील असेल की काळी ब्रा घातल्याने तुम्हाला स्थानांचा कर्करोग होऊ शकतो कारण तुमचे स्तन उष्णता शोषून घेतात कारण काळा रंग उष्णता शोषून घेणारा रंग आहे त्यामुळे स्तनांचा कर्करोग होऊ शकतो.
Viral Video: अरे हे काय? पाठीवर दप्तर टाकून चक्क कुत्रे पाहतायत स्कूल बसची वाट
डॉक्टर तान्या पुढे म्हणाल्या, तुमचे स्तन मॅक्रोवेबमध्ये बंद केलेले नाहीत, ते इतर कोणत्याही गोष्टीशी जोडले गेलेले आहेत, काळया रंगाची ब्रा तुम्हाला कोणताही आजार होऊ देत नाही. त्यामुळे अशा अफवांवर लक्ष देऊ नका. हे मात्र खरं आहे की ब्रा निवडताना ब्रा घातल्यानंतर आपले स्तन दुखू शकतात की नाही त्या प्रकारच्या ब्रा घ्याव्यात निवडताना आपण काही गोष्टी ध्यानात घेणे आवश्यक आहे ज्यामुळे स्तनांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.