Dawood Ibrahim । मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? खासगी रुग्णालयात भरती असल्याची माहिती

Don Dawood Ibrahim Poisoned In Pakistan

Dawood Ibrahim । नवी दिल्ली : मुंबई बॉम्ब स्फोटातील (Mumbai Bomb Blast) आरोपी दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनत आहे. 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटात (Mumbai Bomb Blast 1993) तब्बल 250 जणांचा मृत्यू तर हजारो जण जखमी झाले होते. महत्त्वाचे म्हणजे दाऊद इब्राहीमच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. परंतु पाकिस्तान (Pakistan) दाऊदचा ताबा भारताकडे देण्यास तयार नव्हता. (Latest Marathi News)

Salman Khan । चाहत्यांसाठी चिंतेची बातमी! सलमान खानच्या मेहुण्याच्या कारचा भीषण अपघात, नशेत…

आता त्याच्याबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे. इब्राहिमला पाकिस्तानच्या कराचीतील एका खासगी रूग्णालयात भरती केले असून एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर विषप्रयोग केल्यानंतर त्याची तब्येत चिंताजनक झाल्याची माहिती आहे. परंतु, याबाबत भारत किंवा पाकिस्तान सरकारकडून कोणत्याही प्रकारची पुष्टी करण्यात आली नाही. (Dawood Ibrahim Poisoned In Pakistan)

Nagpur Factory Blast News । नागपूरमध्ये दारुगोळा सप्लाय करणाऱ्या कंपनीत स्फोट, ९ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर

दरम्यान, दाऊदच्या टोळीतील एका माजी सदस्यानं त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. दाऊदला गंभीर आजारामुळे कराचीतील रुग्णालयात दाखल असून त्याला कडेकोट बंदोबस्तात ठेवलं आहे. जेथे दाऊदवर उपचार सुरु आहेत तिथे कोणालाही जाण्याची परवानगी दिली नाही. फक्त उच्चपदस्थ अधिकारी आणि कुटुंबातील जवळच्या लोकांना तिथे जाता येईल, असे त्याने सांगितलं आहे.

Car Accident । मित्रांसाठी ती रात्र ठरली शेवटची, कारचा अतिशय भीषण अपघात! ३ मित्रांचा होरपळून मृत्यू तर २ जण गंभीर जखमी

Spread the love