Donald Trump । अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. ट्रम्प यांना कोलोरॅडो कोर्टाने (Colorado Court) मोठा दणका दिला आहे. अमेरिकेत पुढील वर्षी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक (US presidential election) पार पडणार आहे. परंतु ती निवडणुक ट्रम्प यांना लढवता येणार नाही. कारण कोर्टाने निवडणूक (US election) लढवण्यावर बंदी घातली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. (Latets Marathi News)
Maharashtra Covid Update । महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा धोका वाढला! मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद
तसेच त्यांचं नाव रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या (Republican President) मतदान प्रक्रियेतून वगळले जाणार आहे. याबाबत कोर्टाने राज्य सचिवांना आदेश दिले आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प यांचं नाव आघाडीवर आहे. ट्रम्प यांना अमेरिकेच्या घटनात्मक तरतुदीनुसार राज्यात मतदान करण्यापासून रोखण्यात यावं असे कोर्टाने (Supreme Court) म्हटलं आहे.
Pune News । पुणे हादरलं! भाजप युवा नेत्याची रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्या, नेमकं कारण काय?
दरम्यान, कोलोरॅडो सुप्रीम कोर्टाने असा निष्कर्ष नोंदवला आहे, ‘अमेरिकेच्या राज्यघटनेच्या तरतुदींनुसार अमेरिका सरकारच्या विरोधात कॅपिटल हिलचा हिंसाचार भडकावल्यामुळे ट्रम्प यांना 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्यात येत आहे.’ जरी ट्रम्प यांना अपात्र ठरवले असले तरी सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयाची अंमलबजावणी ४ जानेवारीपर्यंत थांबवली असल्याने ट्रम्प या निर्णयाविरोधात पुन्हा एकदा अपील करू शकतात.
Israel Hamas War Update । जीवन नरक बनले! इस्रायलच्या हल्ल्यात १७ दिवसांच्या मुलीचा गेला जीव