Ram Ramdir । पहिल्याच दिवशी भाविकांकडून राम मंदिराच्या दानपेटीत कोट्यवधींचं दान, किती आले पैसे?

Ram Ramdir

Ram Ramdir । अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीराम तब्बल 500 वर्षानंतर विराजमान झाले आहेत. मोठ्या उत्साहात 22 जानेवारी रोजी प्रभू राम यांची प्राणप्रतिष्ठा केली आहे. (Ram Ramdir Ayodhya) या सोहळ्याचा उत्साह फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी भाविकांकडून राम मंदिरच्या दानपेटीत कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. (Ram Ramdir Ayodhya Donation)

Viral Video । दिल्लीत पाळीव कुत्रा झाला हिंसक, २ वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला, पाहा भयानक व्हिडिओ

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या दोन दिवसांतच राम मंदिराच्या तिजोरीत तब्बल ३.१७ कोटी (Ramdir Ayodhya Donation) रुपये जमा झाले असून भाविकांनी ऑनलाइन देखील देणगी दिली आहे. भाविकांनी तासनतास रांगेत उभे राहून हे दान अर्पण केले आहे. तसेच अनेक उद्योजक आणि सेलिब्रीटींनी राम मंदिरसाठी दान केलं आहे. मंदिर दर्शनासाठी खुलं केल्यानंतर अयोध्येत एकच गर्दी पाहायला मिळत आहे. (Latest marathi news)

Social Media । सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी महिलेने केले घृणास्पद कृत्य; वाचून व्हाल थक्क

दरम्यान, मंदिराच्या उभारणीसाठी 1800 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी 1100 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. अजूनही भाविक दर्शनासाठी अयोध्येत दाखल होत आहेत. येत्या काही दिवसात तिजोरीत आणखी भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Manoj Jarange । कडाक्याच्या थंडीतही मनोज जरांगेंचा रात्रभर प्रवास

Spread the love