गूगल ( Google) हे जगात सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. कुठल्याही गोष्टीची माहिती अगदी सहज गूगल वर उपलब्ध होते. यामुळे एखादी माहिती हवी असेल तर पटकन गूगलवर सर्च करतो. मात्र गूगल वर काही गोष्टी सर्च ( Search) करणे तुम्हाला महागात पडू शकते. इतकंच नाही तर यामुळे तुम्हाला जेल देखील होऊ शकते.
ठाकरेंच्या घरात सनई चौघडा वाजणार; आदित्य ठाकरेंचं ‘या’ वर्षी लग्न होणार?
1) चाईल्ड पॉर्न
गूगलवर तुम्ही चाईल्ड पोर्नोग्राफी सर्च करणे धोक्याचे आहे. यासाठी सरकारने कठोर पाऊले उचलली असून पोक्सो ऍक्ट 2012 अंतर्गत याबद्दल गूगलवर सर्च केल्यास 5 ते 6 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
2) फिल्म पायरसी
फिल्म पायरसी करणे हा गुन्हा आहे. फिल्म पायरसी बद्दल तुम्ही गूगलवर सर्च करत असाल तर तुम्हाला 3 वर्षाच्या जेल सह 10 लाखांचा दंड होऊ शकतो.
“…म्हणून चंद्रकांत पाटील भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यास अनुपस्थित”
3) बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया
तुम्ही गूगल वर जाऊन बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया सर्च करत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. डिव्हाईस किंवा डेस्कटॉप च्या आयपी अँड्रेस ट्रॅक करून याबाबत संशयिताला ताब्यात घेतले जाते.
4)पीडितेची माहिती शेअर करणे
लैंगिक छळ व अत्याचार झालेल्या महिलेबाबत माहिती शेअर करू नये. त्या व्यक्तीचे नाव, फोटो व इतर माहिती सोशल मीडियावर शेअर केल्यास कारवाई होऊ शकते.