मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे यावरूनच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संजय राउतांवर जोरदार टीका केली आहे. रविवारी मराठवाडा नुकसानीचा आढावा एकनाथ शिंदेंनी घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, खासदार संजय राऊत यांचे काय होईल हे मला माहीत नाही पण संजय राऊत म्हणाले होते ‘कर नाही तर डर कशाला’ मग चौकशी होऊनच जाऊ द्या. याचसोबत संजय राऊत म्हणाले होते की ईडीला घाबरून भाजपात जाणार नाही यावर एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, ईडीच्या कारवाईने आमच्याकडे म्हणजेच शिवसेना भाजपकडे कोण येत असेल तर येऊ नये. अर्जुन खोतकर आणि अन्य कोणीही येऊ नका, हे पुण्याचे काम करू नका.
ईडीच्या कारवाईमुळे आलो असे आमच्याकडे आलेल्या एकातरी आमदार किंवा खासदाराने म्हटलेल आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. याचसोबत याआधी देखील केंद्रीय तपास यंत्रणेने अधिक तपास केलेले आहेत. जर चुकीचा तपास केला असता तर न्यायालयाकडून संबंधितांना दिलासा मिळाला असता अस देखील ते म्हणालेले आहेत.
दरम्यान, मागे काय झाले हे मला माहीत नाही. पुढे काय होणार आहे तेच मी बोललो आहे यामुळे मी जे बोललो आहे त्याची अंमलबजावणी करणे हे सरकारचे काम आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. याचसोबत मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक निश्चित व्हावी यासाठी विचार करेल असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत.