
मुंबई : राज्यात महापुरुषांबद्दल वक्तव्य करून चर्चेत येण्याचे सत्र सुरू असल्याचे पहायला मिळते. मागील काही दिवसांत भाजपच्या महत्त्वाच्या व मोठया नेत्यांनी चुकीची वक्तव्ये करत महापुरुषांचा अपमान केला आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Bhagatsing Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथे महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा असणार आहे. त्याचबरोबर भाजपाकडून देखील मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून ‘माफी मांगो आंदोलन’ केलं जाणार आहे. आता यावर जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
बदनामीच्या रागातून वडिल व काकांकडून मुलीची हत्या; स्वतःच्या हाताने सरण रचून जाळले
एकीकडे महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढला आहे तर आता दुसरीकडे भाजपाकडूनही आंदोलन केलं जात आहे. ठाणे-डोंबिवलीत विरोधकांना विरोध करण्यासाठी बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या पार्शवभूमीवर आव्हाडांनी ट्विट करत विरोधकांना टोला लगावला आहे
शेतकऱ्यांचा बांध आता ऑनलाइन दिसणार! जमिनींचे नकाशे डिजिटल होणार
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत लिहिले की, “हसावे का रडावे कळत नाही … ज्या शहरात मुख्यमंत्री स्वतः राहतात त्याच शहरात त्यांचा पक्ष बंद पुकारतो ….. आणि बळा चा वापर करुन दुकान रिक्षा बस बंद करत आहेत आणि पोलिस हाता वर हात ठेऊन बसले आहेत”.
हसावे का रडावे कळत नाही … ज्या शहरात मुख्यमंत्री स्वतः राहतात त्याच शहरात त्यांचा पक्ष बंद पुकारतो ….. आणि बळा चा वापर करुन दुकान रिक्षा बस बंद करत आहेत आणि पोलिस हाता वर हात ठेऊन बसले आहेत
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 16, 2022
बिग ब्रेकिंग! शरद पवार महाविकास आघाडीच्या महामोर्चाल राहणार उपस्थित