पुणे : आज देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंसह आणखी काही नेते पुण्यात विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी पुण्यात अशोक चव्हाण आणि फडणवीस यांची भेट आशिष कुलकर्णी यांच्या घरी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती. याला प्रतिउत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याशी भेट झालेली नाही.
गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने मी पोहोचलो आणि अशोक चव्हाण निघाले होते. एवढच बाकी काही नाही. पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही. तसेच पुण्याची लोकसभाही लढवणार नाही. तुम्हाला मी महाराष्ट्रात नको आहे का, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
Indian Navy: भारतीय नौदलाकडून शिवरायांचा गौरव; राजमुद्रेतून प्रेरणा घेऊन केलं नव्या चिन्हाच अनावरण
नवीन वाद कशाला काढता
पुण्याचे दोन भाग होणार हा नवीन वाद काढू नका. आज तरी राज्य सरकारसमोर असा कुठलाच प्रस्ताव मांडलेला नाही. पण भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो. मुंबईची तिसरी महानगरपालिका करण्याचा देखील कुठलाही विचार आता नाही. त्यामुळे नवनवीन वादाचे विषय काढत बसू नका कारण आपल्याला विकासाकडे जायचे आहे. असे फडणवीस म्हणाले.
Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलं पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं दर्शन, पाहा PHOTO
आज अभिमानाचा दिवस
तसेच फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गात म्हणाले की , भारतीय, मराठी माणसासाठी आज अभिमानाचा दिवस आहे. कारण स्वातंत्र्यांच्या 75 वर्षांतदेखील आपल्या नौसेनेच्या झेंड़्यावर इंग्रजांचे चिन्ह होते, गुलामीचे चिन्ह होते.दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भारतीय नौसेनेची नवी निशाणी फडकवली आहे.